Special Report | औरंगाबादेत भाजपचा जल आक्रोश मोर्चा

| Updated on: May 23, 2022 | 10:16 PM

थेंब थेंब पाण्यासाठी संभाजीनगरचा माणूस तरसतोय, त्यावेळी भाजप शांत बसणार नाही. मी इशारा देतो ज्यावेळी संभाजीनगरमध्ये पाणी पोहोचेल त्याच वेळी हा संघर्ष संपेल. तोवर आम्ही तुम्हाला स्वस्थ झोपू देणार नाही, असा घणाघात फडणवीस यांनी केलाय.

औरंगाबाद : आज औरंगाबाद शहराच्या पाण्याच्या प्रश्नावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात भाजपनं जल आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चाला केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि केद्रीय मंत्री रावसाहेब दाणवे यांनी हजेरी लावली. यावेळी मोर्चात पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देण्यात आल्या. ज्यामुळे अख्खे शहर दणाणून गेले होते. तर या मोर्चात हजारोंच्या सख्येंने महिला वर्ग रिकाम्या घागरी, हंडे हातात घेऊन सहभागी झाल्या होत्या. यावेळी पाणी प्रश्नाच्या (Water issues) मुद्द्यावरुन फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. ‘मुख्यमंत्री म्हणतात मी संभाजीनगर म्हणतो तर समजून जा. मला असं वाटतं आता पाणी मगायला गेलं तर काय म्हणतील… ‘दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा’, कारण ते म्हणतात मी म्हणेल ती काळ्या दगडावरची काळी रेघ आहे’, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र डागलं. तसेच फडणवीस म्हणाले की, हा मोर्टा जनतेचा आहे, त्यांचा आक्रोश आहे. जनतेच्या आक्रोशाला संघटित करण्याचं काम भाजपनं केलं. ज्यावेळी संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी त्राहीमाम चालला आहे. थेंब थेंब पाण्यासाठी संभाजीनगरचा माणूस तरसतोय, त्यावेळी भाजप शांत बसणार नाही. मी इशारा देतो ज्यावेळी संभाजीनगरमध्ये पाणी पोहोचेल त्याच वेळी हा संघर्ष संपेल. तोवर आम्ही तुम्हाला स्वस्थ झोपू देणार नाही, असा घणाघात फडणवीस यांनी केलाय.

Published on: May 23, 2022 10:16 PM