Raigad Irshalwadi Landslide | इर्शालवाडीत दुर्घटनेवर पालकमंत्री सामंत याची प्रतिक्रिया, ‘बाचवकार्य सुरू...’

Raigad Irshalwadi Landslide | इर्शालवाडीत दुर्घटनेवर पालकमंत्री सामंत याची प्रतिक्रिया, ‘बाचवकार्य सुरू…’

| Updated on: Jul 20, 2023 | 10:40 AM

या दुर्घटनेत खालापूरच्या इर्शालगडवाडीतील सुमारे ६० ते ७० कुटुंब गाडली गेल्याची भीती आहे. याची माहिची मिळताच काल रात्रीच रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

रायगड, 20 जुलै 2023 | रायगडमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत खालापूरच्या इर्शालगडवाडीतील सुमारे ६० ते ७० कुटुंब गाडली गेल्याची भीती आहे. याची माहिची मिळताच काल रात्रीच रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी सामंत यांनी या घटनेवरून त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, ही अतिशय दुख:द आणि दुर्दैवी घटना आहे. रात्री आकराच्या सुमारास घडली आहे. याची माहिती मिळताच मी पालकमंत्री म्हणून आणि जिल्हाधिकारी हे दुर्घटना स्थळीच पोहचलो आहोत. येथे येत बाचवकार्य सुरू केलं असून आता पर्यंत २६ लोकांना वाचवण्यात आलं असून दुर्दैवाने या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. पाऊस सुरू असल्याने वरती जाता येत नाही. तर बाचावकार्यात अडथळा येत आहे. तर जे जखमी आहेत किंवा यातून बाहेर काढले जात आहेत त्यांना नवी मुंबई तेथील रूग्णालयात उपचारासाठी पाठवलं जात असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी अधिक माहितीसाठी प्रशासनाकडून
8108195554 हा हेल्पलाईन नंबर देण्यात आल्याचं देखील सांगितलं आहे.

Published on: Jul 20, 2023 10:07 AM