Video: राऊतांनी चिंता करू नये, आमची राजकीय आत्महत्या होणार नाही- मंगेश कुडाळकर
शिंदे गटाचा एकही आमदार पराभूत होणार नाही असे शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर म्हणाले. आमची राजकीय आत्महत्या होणार नाही आणि संजय राऊतांनी चिंता करू नये असा टोलाही त्यांनी मारला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे आमदार मोकळा श्वास घेत आहोत असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यासारखे उत्तम नेतृत्व आम्हाला मिळाले आहे आणि ते आमचे कामं […]
शिंदे गटाचा एकही आमदार पराभूत होणार नाही असे शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर म्हणाले. आमची राजकीय आत्महत्या होणार नाही आणि संजय राऊतांनी चिंता करू नये असा टोलाही त्यांनी मारला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे आमदार मोकळा श्वास घेत आहोत असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यासारखे उत्तम नेतृत्व आम्हाला मिळाले आहे आणि ते आमचे कामं करीत आहेत आमच्याशी मोकळे पणाने बोलत आहेत त्यामुळे आम्हाला चांगले वातावरण अनुभवायला मिळत आहे असेही ते म्हणाले. ही आमची राजकीय आत्महत्या नसून हा पुनर्जन्म असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतले आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनुदान आणि इंधन कर कपातीच्या निर्णयाचा समावेश आहे.
Published on: Jul 16, 2022 02:42 PM
Latest Videos