पुणे पोटनिवडणुकीवरून हा मनसे नेता शिंदे – फडणवीस यांना म्हणाला, घाबरत असाल तर..
वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. ती प्रचंड व्हायरल होत आहे. कसबा आणि पिंपरी चिंचवड येथील भाजपचे दोन आमदार नुकतेच मयत झाले. त्यांच्या सरणाची अजून राखही निवली नाही असे असताना
पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीवरून मनसे नेते वसंत मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न विचारले आहेत. वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. ती प्रचंड व्हायरल होत आहे. कसबा आणि पिंपरी चिंचवड येथील भाजपचे दोन आमदार नुकतेच मयत झाले. त्यांच्या सरणाची अजून राखही निवली नाही असे असताना तुमची मते कमी होतील म्हणून त्या त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या का? विधानसभेची निवडणूक इतक्या लवकर घेण्यात आली मग महापालिकेची निवडणूक का घेत नाही? मागील वर्षापासून पुणे शहराला कोणताही लोकप्रतिनिधी नाही. शहराचे प्रशासनाने वाटोळे लावले आहे. विकास कामे ठप्प झाली आहेत. याला जबाबदार कोण आहे? असे प्रश्न वसंत मोरे यांनी उपस्थित केले आहेत.कोणत्या पक्षाला सहनुभूती मिळेल म्हणून निवडणुका टाळत असताल तर तुमचा पराभव निश्चित समजा, असा इशाराही त्यांनी दिला आहे.