Special Report | शिंदे गट-ठाकरे गटातील नेते चारित्र्यावरून आमने-सामने; वार-पलटवार आणि इशारे
प्रियंका चतुर्वेदी यांच्याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खालच्या आणि चारित्र्यावरून केलेल्या विधानावरून प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अदित्य ठाकरे यांनी आधीच उत्तर दिलं होतं.
मुंबई, 01 ऑगस्ट 2023 | ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये शाब्दीक आणि ट्विटर वॉर होताना दिसत आहे. प्रियंका चतुर्वेदी यांच्याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खालच्या आणि चारित्र्यावरून केलेल्या विधानावरून प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अदित्य ठाकरे यांनी आधीच उत्तर दिलं होतं. तर त्यानंतर शिरसाट यांनी त्यावर पलटवार करताना, आपण कश्या दिसता किंबहुना आपल्या भाषेत सांगायचे झाले तर चरित्र्याचे धिंधवडे आपल्याच पक्ष्यातील श्रीमान खैरे यांनी उडवले आहेत… मला बोलण्यापेक्षा त्यांना विचारलं असतं तर अधिक संयुक्तिक ठरलं असतं… असा टोला लगावला होता. त्यावरून ज्यांचे नाव घेऊन ही टीका करण्यात आली होती. त्या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील शिरसाट त्यांच्यावर टीका करताना थेट इशारा देताना वेळ पडली तर आम्ही शिरसाटला शिवसेना स्टाईल ने सरळ करू असा इशाराच खैरे यांनी दिला आहे. पाहा शिंदे गट-ठाकरे गटातील नेते चारित्र्यावरून आमने-सामने आले आहेत ते या स्पेशल रिपोर्टमधून…