‘सरकारमध्ये एक सीएम, एक माजी, तर एक इच्छुक’; काँग्रेस नेत्याची सरकारवर खोचक टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सगळ्यांनाच धक्का दिला. तसेच त्यांनी राष्ट्रवादीत उभी फूट पाडत एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीवर दावा ठोकला आहे.
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा काहीच दिवसांपुर्वी मंत्रिमंडळ विस्तार झाला. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सगळ्यांनाच धक्का दिला. तसेच त्यांनी राष्ट्रवादीत उभी फूट पाडत एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीवर दावा ठोकला आहे. त्यानंतर आता त्यांच्या सत्तेत येण्याने भाजप आणि शिंदे गटात सध्या नाराजी दिसत आहे. ही नाराजी कमी करण्यासाठी तिसऱ्यांदा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. मात्र याच्याआधीच मी पालकमंत्री होणार असं शिंदे गटातील एका आमदरांनं म्हणत बंडाचे संकेत दिले आहेत. त्यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी डिवचले आहे. यावेळी थोरात यांनी सरकारमध्ये एक सीएम, एक माजी सीएम, तर एक इच्छुक सीएम असल्याचे म्हटलं आङे. तर या तिघांचं एकत्र येणं आणि तिघांचं मेळ बसणं हे जरा अवघडच असल्याचं देखील थोरात यांनी म्हटलं आहे.