लोकराज्याच्या अभिवादनाला लोटला जनसागर; कोल्हापुरचा दसरा चौक शाहूंच्या घोषणांनी दुमदूमला
कोल्हापूरच्या जनतेला समतेचा मोठा विचार दिला ज्याची पाळेमुळे आजही 149 वर्षांनंतरही येथील जनतेच्या आचरणात दिसतात. आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची 149 वी जयंती आहे. त्यासाठी करवीर नगरी सज्ज झाली आहे.
कोल्हापूर : सामान्य जनतेला न्याय आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज मोठं काम केलं आहे. त्यांनी कोल्हापूरच्या जनतेला समतेचा मोठा विचार दिला ज्याची पाळेमुळे आजही 149 वर्षांनंतरही येथील जनतेच्या आचरणात दिसतात. आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची 149 वी जयंती आहे. त्यासाठी करवीर नगरी सज्ज झाली आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध ठिकाणी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आलं. तर येथील दसरा चौकातील पुतळ्याजवळ महाराजांना अभिवादन करण्यासाठी मान्यवरांसह हजारोंचा जनसागर लोटला होता. यावेळी शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते. दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर समता दिंडीला सुरुवात होणार आहे. तर विशेष बाब म्हणजे या समता दिंडीसाठी विविध शाळांचे विद्यार्थी दसरा चौकात दाखल झाले आहेत. तर यावेळी विद्यार्थ्यांनी शाहूंच्या घोषणांनी दसरा चौक दुमदूमला होता.