धक्कादायक! मुंबईत लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट? धमकी देणाऱ्याच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या
तर पुण्यात एटीएसने कारवाई करत दोघा दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर आहेत. याचदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील पुण्याच्या दौऱ्यावर असतानाच आता मुंबईत पुन्हा एकदा मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.
मुंबई, , 06 ऑगस्ट 2013 | जयपूर ते मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची एक धक्कादायक घटना सहा दिवसांपुर्वीच घडली होती. ज्यात 4 जणांचा मृत्यू झाला होता. तर पुण्यात एटीएसने कारवाई करत दोघा दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर आहेत. याचदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील पुण्याच्या दौऱ्यावर असतानाच आता मुंबईत पुन्हा एकदा मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. येथे मुंबईत लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणानंतर मुंबई पोलीस सतर्क होत याचा तपास सुरू केला. तर अवध्या अवघ्या दोन अडीच तासातच याचा छडा लावत जुहू पोलिसांनी धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अशोक मुखिया असे नाव असणाऱ्या आरोपीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करत मुंबईत लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर जुहू पोलिसांनी विलेपार्ले येथील नेहरू नगर परिसरातून त्याला ताब्यात घेतले. तर याबाबत अधिक तपास मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएस करत असून हा फेक कॉल असल्याचं स्पष्ट झालं आहे.