भिडे यांच्यावर कारवाईच्या मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्याला धमकीचे फोन, बंदोबस्तही वाढवला
पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत महात्मा गांधींविरोधात केलेल्या वक्तव्यावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तसेच शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर आता गेल्या तीन दिवसापासून राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसचे नेते आंदोलन करत आहेत.
सातारा, 30 जुलै, 2023 | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत महात्मा गांधींविरोधात केलेल्या वक्तव्यावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तसेच शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर आता गेल्या तीन दिवसापासून राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसचे नेते आंदोलन करत आहेत. तर भिडे यांच्या अटकेची मागणी करत आहेत. याचदरम्यान अमरावतीत भिडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता भिडे त्यांच्या अटकपूर्व जामीनासाठी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून हालचाली सुरु झाल्या असल्याचे कळत आहे. त्याचदरम्यान आता विधानसभेत महात्मा गांधींविरोधात केलेल्या वक्तव्यावरून भिडे यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी देण्यात आली आहे. यावरून सातारा पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला आहे. तर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे.