Three Girl Jump Outside Train | तीन मुलींना मारल्या लोकलमधून उड्या, दैव बलवत्तर म्हणून वाचल्या

| Updated on: Apr 29, 2022 | 2:10 AM

या व्हिडीओत ही मुलगी ट्रेनमधून पडल्यानंतर होम गार्ड अल्ताफ शेख तिला ट्रेनपासून दूर करण्याचा प्रयत्न करत असतानाच ही ट्रेन वेग पकडताना दोन अन्य मुलींनी ट्रेनमधून उडी मारली. या मुलींनी धावत्या ट्रेनमधून उडी मारली आणि त्या प्लॅटफॉर्मवर पडल्या.

मुंबई : मुंबईतील रेल्वे पोलीस कमिश्नर कुशेर खलीद यांनी एक व्हिडीओ ट्विटवरुन शेअर केला. धावती लोकल ट्रेन पकडताना एक मुलगी प्लॅटफॉर्मवर पडल्यानंतर महिला डब्यामधील होम गार्डने प्लॅटफॉर्मवर उडी मारुन तिला ट्रेनखाली येण्यापासून वाचवलं. हा प्रकार जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर 16 एप्रिल रोजी घडला. हा प्रकार स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मात्र या व्हिडीओत ही मुलगी ट्रेनमधून पडल्यानंतर होम गार्ड अल्ताफ शेख तिला ट्रेनपासून दूर करण्याचा प्रयत्न करत असतानाच ही ट्रेन वेग पकडताना दोन अन्य मुलींनी ट्रेनमधून उडी मारली. या मुलींनी धावत्या ट्रेनमधून उडी मारली आणि त्या प्लॅटफॉर्मवर पडल्या.