तीन पक्षाचे तीन नेते, महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत कुणाचा आहे समावेश?
महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रत्येक पक्षातील तीन नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणुकीची रणनीती आणि जगावाटपाबाबत ही समिती निर्णय घेणार आहे.
5 ऑक्टोबर 2023 | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची समन्वय समितीत नेमण्यात आली आहे. महाविकास आघाडीची व्यूहरचना ठरवणे, जागावाटप आणि निवडणुकीची रणनीती काय असेल याचा निर्णय ही समन्वय समिती घेणार आहे. लोकसभेच्या ४८ जागांचा आढावा घेऊन तेथील उमेदवर ठरविण्याची जबाबदारी या समन्वय समितीवर असणार आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे तीन नेत्यांच्या या समन्वय समितीमध्ये समावेश आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई यांचा या समितीत समावेश आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख या नेत्यांची नावे देण्यात आली आहेत. तर कॉंग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बसवराज पाटील आणि नसीम खान यांना संधी दिलीय.