बाईक पुराच्या पाण्यात सोडून दिली म्हणून जीव तरी वाचला; यवतमाळचा थरारक व्हिडिओ

बाईक पुराच्या पाण्यात सोडून दिली म्हणून जीव तरी वाचला; यवतमाळचा थरारक व्हिडिओ

| Updated on: Jul 10, 2022 | 11:54 PM

यवतमाळ( Yavatmal ) गेल्या तीन दिवसांपासून  तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून ओसंडून वाहत आहे. राळेगाव तालुक्यातील लाडकी गावात मुसळधार पाऊस झाल्याने गावातून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. याच पुलावर दुचाकी घेऊन स्टंट करणे लाडकी येथील मंगेश मांडवकर याला चांगलेच महागात पडले आहे.

यवतमाळ :  यवतमाळ( Yavatmal ) गेल्या तीन दिवसांपासून  तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून ओसंडून वाहत आहे. राळेगाव तालुक्यातील लाडकी गावात मुसळधार पाऊस झाल्याने गावातून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. याच पुलावर दुचाकी घेऊन स्टंट करणे लाडकी येथील मंगेश मांडवकर याला चांगलेच महागात पडले आहे.

लाडकी येथील मंगेश मांडवकर हा शेतातून घरी जाताना लाडकी नाल्याला पुराचे पाणी ओसंडून वाहत होते  त्याने आपली दुचाकी त्या पुराच्या पाण्यातून टाकताच नाल्याच्या मधात पुराच्या पाण्याने त्याला दुचाकीसह ओढले दुचाकी घेऊन पुलावरून नदीपात्रात वाहून जाता जाता वाचला आहे. सुदैवाने त्याने दुचाकी  पुराच्या पाण्यात सोडून दिली तो सुखरूप वाचला मात्र त्याची दुचाकी पाण्यात वाहून गेली, अखेर लाडकी येथील ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यात उतरून  काही  तासानंतर दुचाकी पाण्यातून बाहेर काढली. त्यांला हा पुराच्या पाण्यातून दुचाकी टाकण्याच्या जीव घेणा स्टंट चांगलाच महागात पडला.
Published on: Jul 10, 2022 11:54 PM