माँसाहेब जिजाऊंचे दर्शन घेण्यासाठी लाल महालात शिवप्रेमींची गर्दी
पुण्यातील लाल महाल येथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालमनात स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली.
पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ( shivaji maharaj ) यांच्या मातोश्री माँसाहेब जिजाऊ ( maasaheb jijau ) यांचा जयंती उत्सव सोहळा मोठा उत्साहाने पुण्यात ( pune ) साजरा करण्यात येत आहे. माँसाहेब जिजाऊ यांचा जन्म सिंदेखड राजा ( sindkhed raja ) येथे झाला.
पुण्यातील लाल महाल येथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालमनात स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली. माँसाहेब जिजाऊ यांच्या ४२५ व्या जयंती सोहळा उत्सवानिमित्त पुणे महानगर पालिकेने येथे मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट केली आहे.
महापालिकेने लाल महालाचा पुनर्विकास केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणाशी निगडित असलेल्या सर्व आठवणी येथे गेल्यावर ताज्यातवान्या होतात. आज माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त सर्व शिवप्रेमी लाल महालाला भेट देऊन जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक होत आहेत.

भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर

आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव

..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव

पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
