आज शेतकऱ्यांकडे ढुंकून बघायलाही सरकार तयार नाही - शरद पवार

आज शेतकऱ्यांकडे ढुंकून बघायलाही सरकार तयार नाही – शरद पवार

| Updated on: Dec 30, 2023 | 8:35 PM

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी 27 ते 30 डिसेंबर शेतकरी आक्रोश मोर्चा काढला होता. पुण्यात आज या आंदोलनाचा समारोप झाला. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहायला सरकारला वेळ नसल्याची टीका यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

पुणे | 30 डिसेंबर 2023 : आज शेतकऱ्यांकडे कोणी ढुंकूनही बघायला तयार नाही. एवढा मोठा कृषी प्रधान देश परंतू देशाला कृषीमंत्री नाही. दहा दिवसात यवतमाळ, अमरावीत, वर्धा या ठिकाणी 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे काल अमरावतीत गेलो तेव्हा वृत्तपत्रात वाचले. आपण कृषीमंत्री असताना यवतमाळला शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. तेव्हा डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान होते. त्यांना हा विषय सांगितला. यवतमाळच्या शेतकऱ्यांकडे आम्ही गेलो. तेथील परिस्थिती पाहीली. आणि दुसऱ्या दिवशी देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाची माहीती रिझर्व्ह बॅंकेतून काढली आणि देशात सर्वात मोठे 72 हजार कोटीचे कर्ज माफीचे पॅकेज जाहीर केल्याची आठवण यावेळी शरद पवार यांनी सांगितली. आज शेतकरी संकटात असताना त्याच्याकडे लक्ष द्यायलाही तयार नाही असे ते यावेळी म्हणाले.

Published on: Dec 30, 2023 08:33 PM