12th Board Exam 2021 | 12वीच्या परीक्षेबाबत आज निर्णय ? शिक्षण मंत्रालयाचे 3 पर्याय कोणते ?

| Updated on: Jun 01, 2021 | 5:55 PM

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे ही बैठक लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. (Today's decision regarding 12th exam, What are the 3 options of the Ministry of Education)

नवी दिल्ली: संपूर्ण देशातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या बारावीच्या परीक्षेसंदर्भात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच महत्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आज दिल्लीत बारावीच्या  परीक्षेसंदर्भात (HSC exam) केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार होती. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे ही बैठक लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती.