उद्धव ठाकरे यांचं मशाल चिन्ह राहणार की जाणार? सुप्रीम कोर्टात आज फैसला

उद्धव ठाकरे यांचं मशाल चिन्ह राहणार की जाणार? सुप्रीम कोर्टात आज फैसला

| Updated on: Jul 17, 2023 | 12:09 PM

ठाकरे गटाला निवडणुकीत देण्यात आलेलं मशाल हे चिन्ह देखील आता अडचणीत आलं आहे. उद्धव ठाकरे गटाला दिलेल्या मशाल चिन्हावर समता पार्टीने आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. आज या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली, 17 जुलै 2023 | एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. या सत्तासंघर्षाच्या लढाईत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं. यानंतर ठाकरे गटाला निवडणुकीत देण्यात आलेलं मशाल हे चिन्ह देखील आता अडचणीत आलं आहे. उद्धव ठाकरे गटाला दिलेल्या मशाल चिन्हावर समता पार्टीने आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. आज या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे मशाल चिन्ह राहणार की जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

Published on: Jul 17, 2023 12:09 PM