आता या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची होणार बैठक

आता या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची होणार बैठक

| Updated on: Jan 17, 2023 | 9:41 AM

संजय राऊत हे काही काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. त्यामुळे ते काय बोलले ते मला माहित नाही.

अमरावती : विधान परिषदेच्या ( VIDHAN PARISHD ) निवडणुकीत भाजप, ( BJP ) शिंदे गट ( SHINDE GROUP ) विरुद्ध महाविकास आघाडी ( MAHAVIKAS AGHADI ) असा थेट सामना रंगणार आहे. पाच जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

नाशिकमध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉ. सतीश तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने पेचप्रसंग निर्माण झाला होता. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत समन्वय हवा असे विधान केले होते.

त्यावरून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत हे काही काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. त्यामुळे ते काय बोलले ते मला माहित नाही असे म्हटले आहे. उद्या सकाळी महाविकास आघाडीची पदवीधर निवडणुकांसंदर्भात बैठक होणार आहे. त्यानंतर आम्ही आपली भूमिका जाहीर करू असे ते म्हणाले आहेत.

Published on: Jan 17, 2023 09:41 AM