TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 7 : 30 PM | 21 July 2021 लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना बाहेर फिरण्याची परवानगी मिळणार?

| Updated on: Jul 21, 2021 | 8:29 PM

लसीकरण मोठ्या प्रमाणावर झालं आहे. त्यामुळे ज्यांना दोन डोस देण्यात आले आहेत. त्यांना बाहेर पडायला टप्प्याटप्प्याने सुरुवात केली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार आज पिंपरी-चिंचवडमध्ये होते. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. लसीकरण मोठ्या प्रमाणावर झालं आहे. त्यामुळे ज्यांना दोन डोस देण्यात आले आहेत. त्यांना बाहेर पडायला टप्प्याटप्प्याने सुरुवात केली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत मी परवा मुख्यमंत्र्यांशी बोलेल. पण लोकांना बाहेर पडण्याची मुभा द्यावी की देऊ नये याबाबतचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते इथून पुढे 100 ते 120 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं अजित पवार म्हणाले.

Video | कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्या : प्रविण दरेकर
Special Report | राज कुंद्रा यांची पॉर्न फिल्ममधून रोज 10 लाखांची कमाई?