VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 06 June 2022
आमदार आशिष जैस्वाल यांनी राज्यातील मंत्र्यांवर अतिशय गंंभीर आरोप केले आहेत. काही मंत्री आमदारांना टक्केवारी मागतात, असा थेट आरोप जैस्वाल यांनी मंत्र्यांवर केला आहे. मात्र, हे मंत्री नेमके कोणते जे आमदारांना टक्केवारी मागतात यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. जैस्वाल यांच्या आरोपांनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापण्याची देखील शक्यता आहे.
आमदार आशिष जैस्वाल यांनी राज्यातील मंत्र्यांवर अतिशय गंंभीर आरोप केले आहेत. काही मंत्री आमदारांना टक्केवारी मागतात, असा थेट आरोप जैस्वाल यांनी मंत्र्यांवर केला आहे. मात्र, हे मंत्री नेमके कोणते जे आमदारांना टक्केवारी मागतात यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. जैस्वाल यांच्या आरोपांनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापण्याची देखील शक्यता आहे. जैस्वाल हे फक्त मंत्र्यांवर आरोपच करून थांबले नाहीतर त्यांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे देखील सांगितले आहे. आमदार या सरकारच्या विरोधात जाऊ शकतात, असा इशारा त्यांनी दिला आहे. मतदारसंघाला न्याय मिळायला पाहिजे. निधीचा असमतोल आम्ही कधीही सहन करणार नाही. मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यावरच निधी दिला जातो असेही, जैस्वाल बोलताना म्हणाले आहेत.
Published on: Jun 06, 2022 12:21 PM