TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 28 September 2022-tv9

TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 28 September 2022-tv9

| Updated on: Sep 28, 2022 | 11:58 AM

पीएफआयवर करण्यात आलेल्या या कारवाईचे स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तसेच अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार देखिल मानले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रीलयाने पीएफआयला बेकायदेशिर ठरवले आहे. तसेच पीएफआयवर पाच वर्षांची बंदी ही घालण्याचा निर्णय देखिल केंद्रीय गृहमंत्रीलयाने आज घेतला आहे. त्याचबरोबर पीएफआयची स्थापना करणारे काही जन हे सिमीचे सदस्य असल्याचे देखिल केंद्रीय गृहमंत्रीलयाकडून सांगण्यात आलं आहे. याचवेळी पीएफआयवर करण्यात आलेल्या या कारवाईचे स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तसेच अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार देखिल मानले आहेत. तर भाजपकडून सुरू असणाऱ्या दांडियावर सामनामधून टीका करण्यात आली आहे. यावेळी सामनातून कमळाबाईंचा आता मराठी दांडिया! कमळाबाईच्या मराठी दांडियाने हलणार नाही असं ही सामनातून म्हटलं आहे.

 

 

Published on: Sep 28, 2022 11:58 AM