शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या बातमीसह पहा टॉप 9 न्यूज
रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे. तसेच मंत्रीपदासाठी आमदार गुडघ्याला बाशिंग बांधुन बसले आहेत. मात्र विस्तार होत नसल्याने त्यांची नाराजी समोर येत असल्याचेही खडसे म्हणाले.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तर मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार हे नाराज असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नाराज आमदारांची नाराजी दुर करण्यासाठी त्यांची वर्णी महामंडळांवर केली जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. यादरम्यान अनेक वर्षांपासून महामंडळांच्या नियुक्त्या या रखडल्या आहेत. त्यालवकरच होणार असल्याचे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. तर रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे. तसेच मंत्रीपदासाठी आमदार गुडघ्याला बाशिंग बांधुन बसले आहेत. मात्र विस्तार होत नसल्याने त्यांची नाराजी समोर येत असल्याचेही खडसे म्हणाले. याचदरम्यान मंत्री गिरीष महाजन यांनी 1000 कोटींची कामे रद्द केल्याने देखिल आमदार हे नाराज असल्याचेही खडसे म्हणाले. तर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पुढील 6 महिने मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याचे सांगत शिंदे- फडणवीस सरकारला टोला लगावला. तसेच मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्यानेच त्यांना महामंडळाचे गाजर दाखवून शांत केलं जात आहे असेही ते म्हणाले.