मनसेच्या दीपोत्सोव कार्यक्रमासह पहा राज्यातील इतर घडामोडी टॉप 9 न्यूजमध्ये

मनसेच्या दीपोत्सोव कार्यक्रमासह पहा राज्यातील इतर घडामोडी टॉप 9 न्यूजमध्ये

| Updated on: Oct 21, 2022 | 8:45 PM

भास्कर जाधव यांनी भापवर टीका केली आहे. यावेळी भाजपणे आमचा पक्ष फोडण्याच्या संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ते जमलं नाही म्हणून आमदार फोडत पक्षावर घाला घातल्याचेही जाधव म्हणाले.

मनसेच्या दीपोत्सोव कार्यक्रमात राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले. त्यांच्या एकत्र आल्याने राज्यात नव्या महायुतीची नांदी तर सुरू झाली नाही ना अशी चर्चा उपस्थितांसह राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेच्या दीपोत्सोव कार्यक्रमावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच इच्छा असूनही मनसेच्या दीपोत्सोवाला जाता येत नव्हतं असेही शिंदे म्हणाले. याचदरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवाळीच्या शुभेच्छा जनतेला दिल्या. तसेच मनसेच्या दीपोत्सोवाला बोलावल्या बद्दल त्यांनी राज ठाकरे यांचे आभार देखिल मानले. तर सिंधुदुर्गमध्ये भास्कर जाधव यांनी भापवर टीका केली आहे. यावेळी भाजपणे आमचा पक्ष फोडण्याच्या संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ते जमलं नाही म्हणून आमदार फोडत पक्षावर घाला घातल्याचेही जाधव म्हणाले. तर जाधव हे घरावरील हल्ल्यानंतर पहिल्यांदाच चिपळूनमध्ये गेले होते. यादरम्यान ते भावून झाले तर त्यांना अश्रू ही अनावर झाल्याचे पहायला मिळाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला. यावेळी शिंदे यांनी कोणाला अंगावर घ्यायचं असेल तर मी आहेच असं म्हटलं आहे.

 

Published on: Oct 21, 2022 08:45 PM