फडणवीस यांची काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर टीका, पहा काय म्हणाले, टॉप 9 न्यूजमध्ये
फडणवीस यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली आहे. यावेळी फडणवीस यांनी, काँग्रेसची ही यात्रा भारत जोडोची नसून विरोधी पक्ष जोडो यात्रा असल्याचे म्हटलं आहे.
अंधेरी पोट निवडणूकीवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच ठाकरे यंनी नाव, चिन्ह गोठवून भाजपने अंधेरी पोटनिवडणूकीतून पळ काढल्याचे ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच ठाकरे यांनी अंधेरी पोटनिवडणूकीत भाजपची भूमिका ही मनस्ताप देणारी होती असेही त्यांनी म्हटलं आहे. तर निवडणूक आयोगाने काही काळापूरतच पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं आहे. ते पक्षाला परत मिळणार असल्याचं ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत दिली. ते केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भेटीनंतर बोलत होते. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भेटीनंतर नागपूर रेल्वे स्टेशन पुनर्विकासासाठी 472 कोटी रूपयांचा निधी मिळाल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. तसेच फडणवीस यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली आहे. यावेळी फडणवीस यांनी, काँग्रेसची ही यात्रा भारत जोडोची नसून विरोधी पक्ष जोडो यात्रा असल्याचे म्हटलं आहे. तर रोहित पवार यांनी भाजपवर केलेल्या आरोपांना फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी स्वत:चं महत्व वाढविण्यासाठी रोहित पवार असं वक्तव्य करत असल्याचे म्हटलं आहे.