ठाकरेंना मिळाली 'मशाल', या बातमीसह पहा इतर अपडेट टॉप 9 न्यूज 9 PM मध्ये

ठाकरेंना मिळाली ‘मशाल’, या बातमीसह पहा इतर अपडेट टॉप 9 न्यूज 9 PM मध्ये

| Updated on: Oct 10, 2022 | 10:10 PM

बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी आमची सेना असल्यानेच बाळासाहेबांची शिवसेना मिळाल्याचे शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह आणि नावं दोन्ही गोठवलं होतं. त्यानंतर आता आयोगाने आपला निर्णय जाहिर केला आहे. उद्धव ठाकरे यांना आयोगाने मशाल हे चिन्ह तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलं आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून अंधेरी पोटनिवडणूक ही नव्या चिन्हावर आणि नव्या पक्षाच्या नावाने लढणवार आहे. तसेच शिंदे गटालाही नवे नाव देण्यात आले आहे. बाळासाहेबांची शिवसेना असे त्यांना नाव मिळाले आहे. तर उद्या 10 पर्यंत चिन्हांचा पर्याय आयोगाला द्यायचा आहे. तर बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी आमची सेना असल्यानेच बाळासाहेबांची शिवसेना मिळाल्याचे शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. दरम्यान नवे चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळाल्याने अंधेरीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर ठाकरे गटाच्या नेत्या सुष्मा अंधारे यांनी शिंदेंवर टीका केली आहे. तर गेल्या दोन महिन्यापासून शिंदे हे बालहट्ट करत आहेत. तर ते कोणत्याही चिन्हावर आणि नावावर दावा करू शकतात असा घणाघात अंधारे यांनी शिंदेंवर केला आहे. तर मेजॉरिटी असतानाही आम्हाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं नाही. त्यामुळे खरा अन्याय आमच्यावर झाल्याचे उदय सामंत म्हणाले.

Published on: Oct 10, 2022 10:10 PM