… तर लटके यांच्या ऐवजी कमलेश राय किंवा प्रमोद सावंत यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार, यासह पहा टॉप 9 न्यूज
लटके यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही तर लटके यांच्या ऐवजी कमलेश राय किंवा उप विभाग संघटक प्रमोद सावंत यांच्यापैकी एकाला उमेदवारी देण्यात येईल.
राज्यात खरी शिवसेना कोणाची यावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्यानंतर आता वेगळाच प्रश्न उभा राहीलेला पहायला मिळत आहे. होऊ घातलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिंदेच्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये खटके उडताना दिसत आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि महाविकास आघाडी पक्षाच्या अधिकृत उमेदवार ऋतुजा लटके यांच्यावरून आता राजकारण तापत आहे. लटकेंचा मनपा कर्मचारी पदाचा राजीनामा अजूनही आयुक्तांनी स्वीकारला नसल्याने वेगळा पेच निर्माण झाला आहे. तर त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाहीच तर ठाकरे गटाकडून बी प्लॅन तयार करण्यात आला आहे. सोबतच उच्च न्यायालयाचेही दरवाजे ठोठावण्यात आले आहे. जर लटके यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही तर लटके यांच्या ऐवजी कमलेश राय किंवा उप विभाग संघटक प्रमोद सावंत यांच्यापैकी एकाला उमेदवारी देण्यात येईल. तर लटकेंचा राजीनामा स्वीकारण्यात येऊ नये म्हणून आयुक्तावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून अनिल परब यांनी केला आहे.