TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 03 October 2022 -TV9
एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेनंतर गिरीष महाजन यांनी खडसेंवर पलटवार केला आहे. ते म्हणाले, आधी खडसेंनी स्वत: ची काळजी घ्यावी.
एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांची भेट आपल्या समोर घेतली होती. तर फडणवीस, तुम्ही आणि मी बसून जे काही असेल ते मिटवून घेऊ असे खडसेंनी म्हटलं होतं असा गौप्यस्फोट मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. तर अमित शाहांनी खासदार रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांना भेट दिली नाही. त्यांनी शाहांनी त्यांच्या ऑफिसबाहेर 3 तास बसवून ठेवल्याचेही महाजन म्हणाले. दमदाटी करणाऱ्यांची सत्ता जाणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तर आमची सत्ता कधी येईल हे कळणारही नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनो कोणत्याही दबावाला बळी पडू नका, कारण नसताना चुकीचं कामं करू नका. दिवस हे बदलत असतात, असे पवार म्हणाले. तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. तर 50 खोके घेतले असतील तर मग मंत्रीपद कशाला हवं असा सवाल केला आहे. एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेनंतर गिरीष महाजन यांनी खडसेंवर पलटवार केला आहे. ते म्हणाले, आधी खडसेंनी स्वत: ची काळजी घ्यावी.