निवडणुकीच्या निकालावर आमदारांच्या प्रतिक्रिया; कुणी म्हणतोय “बाजीगर तो बाजीगर होता है” तर कुणी म्हणतोय…
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधकांच्या राजकारणाला तडा गेला असल्याचे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. सगळ्या मतांचे समीकरण झाले असून महाविकास आघाडीचा विजय हॊणार असल्याचा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा हिशोब विधानपरिषद निवडणुकीत चुकता होईल असं शिवसेना आमदार […]
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधकांच्या राजकारणाला तडा गेला असल्याचे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. सगळ्या मतांचे समीकरण झाले असून महाविकास आघाडीचा विजय हॊणार असल्याचा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा हिशोब विधानपरिषद निवडणुकीत चुकता होईल असं शिवसेना आमदार भास्कर जाधव म्हणाले. निकालानंतर वाऱ्यासारखे उडणारे जमिनीवर येतील असा टोलाही त्यांनी लगावला. बाजीगर तो बाजीगर होता है अशी प्रतिक्रिया भाजपचे आशिष शेलार यांनी दिली आहे. भाजपाला व्याजासकट परतफेड मिळणार असल्याचं वक्तव्य आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
Published on: Jun 20, 2022 04:27 PM
Latest Videos