रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस; वाशिष्ठी नदीची पाणीपातळी वाढली

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस; वाशिष्ठी नदीची पाणीपातळी वाढली

| Updated on: Jul 06, 2022 | 9:33 AM

कोकणात पावसाची संततधार सुरूच आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. चिपळूणच्या वाशिष्ठ नदीची पाणीपातळी वाढली असून, नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.

कोकणात पावसाची संततधार सुरूच आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. चिपळूणच्या वाशिष्ठ नदीची पाणीपातळी वाढली असून, नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

 

Published on: Jul 06, 2022 09:33 AM