विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्शासाठी भाविकांनी पंढरपूर फुललं

विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्शासाठी भाविकांनी पंढरपूर फुललं

| Updated on: Apr 09, 2023 | 3:53 PM

पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली दिसत आहे. भाविकांच्या गर्दीमुळे पंढरपूर फुलून गेले आहे. विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत गेलेली आहे

पंढरपूर : सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे लोक पर्यटनासह देवदर्शनासाठी गराबाहेर पडले आहेत. गर्दीमुळे शिर्डीतील साई बाबा मंदिररासह इतर धर्मस्थळांवर लोकांची गर्दी पहायला मिळत आहे. याचप्रमाणे पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली दिसत आहे. भाविकांच्या गर्दीमुळे पंढरपूर फुलून गेले आहे. विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत गेलेली आहे. तर मुख दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. शुक्रवारी गुड फायडे, शनिवार आणि आज रविवार असा सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी झाली आहे.