नयनरम्य निसर्ग…धो-धो वाहणाऱ्या सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी!

नयनरम्य निसर्ग…धो-धो वाहणाऱ्या सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी!

| Updated on: Jul 31, 2023 | 9:07 AM

जुलै महिन्यात पडलेल्या जोरदार या पावसामुळे नद्यांना पूर आले असून, अनेक ठिकाणी धबधबे कोसळताना पाहायला मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा देखील कोसळतांना पाहायला मिळत आहे.

नांदेड, 31 जुलै 2023 | जुलै महिन्यात पडलेल्या जोरदार या पावसामुळे नद्यांना पूर आले असून, अनेक ठिकाणी धबधबे कोसळताना पाहायला मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा देखील कोसळतांना पाहायला मिळत आहे. सलग आलेल्या दोन दिवसाच्या सुट्टीमुळे नांदेडच्या सहस्त्रकुंड इथल्या धबधब्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. राज्यभरातून पर्यटक सहस्त्रकुंड या धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी रविवारी आले होते. या गर्दीचे ड्रोन व्हिडीओ फोटोग्राफर पवन निमलवाड यांनी tv9 मराठीच्या दर्शकांसाठी घेतले आहेत.

Published on: Jul 31, 2023 09:07 AM