VIDEO | कोकणातील पर्यटनाचे हॉटस्पॉट असणाऱ्या समुद्र किनाऱ्याला बिपरजॉयचा फटका; पर्यटक जखमी

VIDEO | कोकणातील पर्यटनाचे हॉटस्पॉट असणाऱ्या समुद्र किनाऱ्याला बिपरजॉयचा फटका; पर्यटक जखमी

| Updated on: Jun 12, 2023 | 7:35 AM

बिपरजॉय चक्रीवादळ हे येत्या 36 तासात आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे अरबी समुद्राच्या किनारपट्टीभागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. याचकारणाने मच्छिमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याने (IMD) दिला.

रत्नागिरी : गेल्या दोन दिवसांपुर्वीच हवामान विभागाकडून ‘बिपरजॉय‘ चक्रीवादळावरून चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार बिपरजॉय चक्रीवादळ हे येत्या 36 तासात आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे अरबी समुद्राच्या किनारपट्टीभागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. याचकारणाने मच्छिमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याने (IMD) दिला. तर आता बिपरजॉय चक्रीवादळामुळे रत्नागिरीतील गणपतीपुळे इथे समुद्राला उधाण आले आहे. या समुद्राला आलेल्या उधाणामुळे पर्यटक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. समुद्रकिनारी असलेल्या दुकानांचेही या उधाणामुळे नुकसान झाले आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्राला मोठी भरती येण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये यावेळी मोठ्या लाटा उसळतील तर मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग या किनारपट्टीवरती वादळी वाऱ्यासह लाटा उसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याचदरम्यान मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे. रत्नागिरी, श्रीहरी कोटासह वसईत पावसाने हजेरी लावली.

Published on: Jun 12, 2023 07:35 AM