भक्तांच्या अलोट गर्दीत अंबाबाईचा रथोत्सव सोहळा
जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्री अंबाबाईचा रथोत्सव होत असतो. गेल्या काही वर्षांत या सोहळ्याला एक वेगळा दर्जा आला आहे. अख्खं कोल्हापूर या सोहळ्याला रथोत्सव मार्गावर उतरलेला असतो
कोल्हापूर : पारंपरिक वाद्यांचा थाट, नयनरम्य विद्युत रोषणाई, फुलांची उधळण आणि सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या हा बाज पहायला मिळात होता करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळ्यात. अंबाबाईचा रथोत्सव सोहळा पाहण्यासाठी सारे शहर रथोत्सव मार्गावर आलं होतं. यावेळी देवीसाठी नवीन रथ तयार करण्यात आला असून त्यातून देवीची नगर प्रदक्षिणा पार पडली.
जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्री अंबाबाईचा रथोत्सव होत असतो. गेल्या काही वर्षांत या सोहळ्याला एक वेगळा दर्जा आला आहे. अख्खं कोल्हापूर या सोहळ्याला रथोत्सव मार्गावर उतरलेला असतो. महाद्वारपासून सुरू झालेली नगरप्रदक्षिणा गुजरीमधून भवानी मंडपात येते. त्यानंतर मिरजकर तिकटी आणि बिन खांबी गणेश मंदिर इथून पुन्हा मंदिरात पोहोचते. या रथोत्सवाची ड्रोन दृश्य खास tv9 च्या प्रेक्षकांसाठी…