मुंबई अहमदाबाद महामार्ग : प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; मुंबईहून गुजरात आणि गुजरातहून मुंबईला येणारा मार्ग जाम
ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून या पाण्यातून वाट नागरिकांना काढावी लागत आहे. याचदरम्यान सततच्या आणि जोरदार पडणाऱ्या पावसाचा फटका आता मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला बसत आहे.
वसई, 27 जुलै 2023 | मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीनव विस्कळीत झाले आहे. तर सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून या पाण्यातून वाट नागरिकांना काढावी लागत आहे. याचदरम्यान सततच्या आणि जोरदार पडणाऱ्या पावसाचा फटका आता मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला बसत आहे. येथे सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यात खड्यांचे साम्राज्य झाले आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झाली आहे. तर मुंबईहून गुजरात आणि गुजरातहून मुंबईला जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या लेनवर 2 किलोमीटर तर गुजरातहून मुंबईला जाणाऱ्या लेनवर 10 किलोमीटरपर्यंत लांबच्या लांब रांग लागली आहे. वसई हद्दीत मालजीपाडा, ससूनवघर, कामन क्रीक ब्रिज या ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले असून त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे समोर येत आहे.