मुंबईकरांची चिंता कधी मिटणार? वाहतूक कोंडीचा फटका; पूर्व द्रुतगती मार्गावार वाहनांच्या रांगा, मुंबईकर हैराण

मुंबईकरांची चिंता कधी मिटणार? वाहतूक कोंडीचा फटका; पूर्व द्रुतगती मार्गावार वाहनांच्या रांगा, मुंबईकर हैराण

| Updated on: Jul 27, 2023 | 11:24 AM

दरम्यान, मुंबईसह उपनगरात पाऊस सुरुच आहे. त्याचदरम्यान मुंबईत आज अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडू वर्तवण्यात आली आहे. मुंबईला आधी रेड अलर्ट देण्यात आलं होतं मात्र आता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई, 27 जुलै 2023 | राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) होताना दिसत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगरात पाऊस सुरुच आहे. त्याचदरम्यान मुंबईत आज अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडू वर्तवण्यात आली आहे. मुंबईला आधी रेड अलर्ट देण्यात आलं होतं मात्र आता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे काहीसं समाधानाची बातमी मुंबईकरांसाठी आहे. मात्र पाऊस कमी होत असतानाच दुसरीकडे वाहतूक कोंडीचा फटका मुंबई करांना बसत आहे. येथील कांजूरमार्ग पूर्व द्रुतगती मार्गावार ऐन पावसाळ्यात वाहतूक टप्प होत आहे. तर वाहणांचा रांगा लागताना दिसत आहेत. ही वाहतूक कोंडी मुंबईकडे जाणार्या मार्गावर होत आहे. त्यामुळे याचा मुंबईकरांना बसताना दिसत आहे.

Published on: Jul 27, 2023 11:24 AM