आंबेनळी घाटात वाहतुकीला ब्रेक; घाटातून प्रवास न करण्याचे तहसीलदारांचे आवाहन, कारण काय?
कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊसला सुरूवात झाली आहे. ज्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. तर अनेक बंधारे हे पाण्याआखी गेले आहेत.
सातारा, 19 जुलै 2023 | राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. तर कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊसला सुरूवात झाली आहे. ज्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. तर अनेक बंधारे हे पाण्याआखी गेले आहेत. तर अनेक घाटात पावसाचे प्रमाण वाढल्याने दरड कोसळल्याच्या घटनाही समोर येत आहे. याच्याआधी देखील साताऱ्यात अनेक घाटात दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या होत्या. याचदरम्यान आता पुन्हा एकदा साताऱ्यात दरड कोसळली आहे. ज्यामुळे आंबेनळी घाटात वाहतूक टप्प झाली आहे. तर येथून प्रवास करू नये असा सल्ला तहसिलदार यांनी म्हटलं आहे. आंबेनळी घाटात भलीमोठी दरड कोसळल्याने सध्या महाबळेश्वर हून पोलादपूरकडे आणि पोलादपूर हून महाबळेश्वर कडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. रायगड हद्दीत आंबेनळी घाटात चिरेखिंडी येथे दरड कोसळली आहे.