Gunratan Sadavarte यांनी स्वतःचे अपयश लापवण्यासाठी हा सर्व उद्योग केला - Anil Parab

Gunratan Sadavarte यांनी स्वतःचे अपयश लापवण्यासाठी हा सर्व उद्योग केला – Anil Parab

| Updated on: Apr 09, 2022 | 8:30 PM

कायदा ज्यांनी हातात घेतला त्यांनी कोर्टाचा अपमान केलाय. त्यामुळे नक्कीच त्यांच्यावर कारवाई होईल. पोलीस कोठडी म्हणजे चौकशी ही चौकशी कशी पुढे जाईल आणि चौकशीत नकाय पुढे येईल त्याच्यावर ठरेल. गुणरत्न सदावर्ते यांनी चिथावणी दिली पोलिस चौकशीत बाहेर येईल, असे अनिल परब यांनी सांगितले.

मुंबई : कायदा हातात घेतला की काय होतं हे त्यांना माहीत पडलंय. कारण ते वकील आहेत त्यांना माहिती आहे कायदा हातात घेतल्यावर काय होतं. चिथावणीखोर भाषणे करून त्याने आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न केला. आता कायदा आपलं काम करेल कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होईल. कायद्यामधल्या तरतुदींनुसार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना 22 तारखेपर्यंत रुजू होण्याचे आदेश दिलेत त्याची माहिती देण्यासाठी आलो होतो. एसटी पूर्णक्षमतेने कशी चालू करायची यासंदर्भात चर्चा केली. शरद पवार साहेबांचं मार्गदर्शन घेतलं. हायकोर्टाने आदेश दिलाय तो आम्ही तपासून पाहत आहोत न्यायालयाने कोणालाही सांगितले नाही की कायदा हातात घ्या. कायदा ज्यांनी हातात घेतला त्यांनी कोर्टाचा अपमान केलाय. त्यामुळे नक्कीच त्यांच्यावर कारवाई होईल. पोलीस कोठडी म्हणजे चौकशी ही चौकशी कशी पुढे जाईल आणि चौकशीत नकाय पुढे येईल त्याच्यावर ठरेल. गुणरत्न सदावर्ते यांनी चिथावणी दिली पोलिस चौकशीत बाहेर येईल, असे अनिल परब यांनी सांगितले.