Thane Rakhi | केळीच्या झाडाच्या खोडापासून तिरंगी राख्या

Thane Rakhi | केळीच्या झाडाच्या खोडापासून तिरंगी राख्या

| Updated on: Aug 07, 2022 | 9:29 PM

केळीच्या खोडापासून म्हणजे बनाना फायबर पासून अत्यंत बारीक काम करून या सुबक राख्या तयार करण्याचे प्रशिक्षण बारा गावातील 120 महिलांना केशवसृष्टी च्या माध्यमातून देण्यात आले आहे.

ठाणे : पालघर जिल्ह्यातील वाडा  तालुक्यात केशवसृष्टी संस्था महिलांना सक्षम करण्याचे काम करीत असून पर्यावरण पोषक असणाऱ्या  केळीच्या खोडापासून म्हणजे बनाना फायबर(banana tree) पासून तिरंगी राख्या(Tricolor rakhis ) तयार केल्या आहेत. या राख्यांना दिलेल्या तिरंग्याच्या रंगामुळे या राख्या आणखी आकर्षक झाल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व राख्या देशाच्या वेगवेगळ्या सीमा भागात रक्षण करणाऱ्या सैनिकांपर्यंत दहा हजार राख्या पोहचविण्यात आल्या आहेत. तसेच चौदा हजार राख्या विविध शहरात पोहचविण्यात आल्या आहेत.

केळीच्या खोडापासून म्हणजे बनाना फायबर पासून अत्यंत बारीक काम करून या सुबक राख्या तयार करण्याचे प्रशिक्षण बारा गावातील 120 महिलांना केशवसृष्टी च्या माध्यमातून देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील  स्वयंरोजगारावर उभ्या राहू पाहणाऱ्या महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध  करण्यात आल्याची माहिती केशवसृष्टीचे राखी या प्रक्लपाचे प्रमुख मुकेशजी पाध्या यांनी दिली. यापुढे असे अनेक प्रकल्प आम्ही राबविणार आहेत –ग्रामीण भागातील महिलांना प्रशिक्षित करण्याचे काम  वैशाली गावित या करीत आहेत. 

Published on: Aug 07, 2022 09:28 PM