त्र्यंबकेश्वर मंदिर वादावर पडदा? पुजाऱ्यांची इच्छा नसल्यास, ‘धूप प्रथा’ बंद करू? कोणाची नाराजी?
दरम्यान, यावरून अनेक बातम्या पेरल्या गेल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये वर्षानुवर्षे हिंदू-मुस्लीम धर्मीय गुण्यागोविदांने राहतात, आजवरच्या इतिहासात असा वाद कधीच निर्माण झाला नव्हता अशी नाराजी नगर वासियांसह शांतता समितीचे सदस्य नबीयून शेख यांनी व्यक्त केली आहे.
नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरात दुसऱ्या धर्माच्या गटाने प्रवेशाची मागणी केल्यावरून निर्माण झालेल्या वादात पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटांना समज देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यावरून अनेक बातम्या पेरल्या गेल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये वर्षानुवर्षे हिंदू-मुस्लीम धर्मीय गुण्यागोविदांने राहतात, आजवरच्या इतिहासात असा वाद कधीच निर्माण झाला नव्हता अशी नाराजी नगर वासियांसह शांतता समितीचे सदस्य नबीयून शेख यांनी व्यक्त केली आहे. तर याबाबत खूपच भडक बातम्या दाखवण्यात आल्या. त्र्यंबकेश्वरच्या इतिहासात कधीच धार्मिक कार्यक्रमांना गालबोट लागलेलं नव्हतं. धूप प्रथेबाबत काही लोक म्हणतात की आधीपासून हे केलं जात होतं, काही जण म्हणतात, तसं केलं जात नव्हतं. त्यामुळे संदलदरम्यान धूप दाखवण्याच्या प्रथेवर कुणाचा आक्षेप असेल तर ही प्रथा बंद करू, असं संदल आयोजकांनी मान्य केलं आहे. माझ्या माहितीनुसार, कधी पायरीपर्यंत जाऊन कधी बाहेरून धूप देण्यात येत होती. गेल्या काही वर्षांत कोरोनामुळे मिरवणूक झाली नाही, पण आता मिरवणूक पुन्हा सुरू झाली होती. पण इथून पुढे पुजाऱ्यांची इच्छा नसल्यास धूप आरती करणार नाही, असं आयोजकांनी म्हटलं आहे. हे प्रकरण विनाकारण वाढवून-चढवून मांडलं जात आहे अशीही नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.