सध्यातरी त्र्यंबकेश्वर वादावर पडदा मग मंदिराजवळ पोलिस फौजफाटा का? आता कोणता वाद उफाळला?

| Updated on: May 23, 2023 | 12:38 PM

त्र्यंबकेश्वर परिसरात सामाजिक सलोखा, शांतता बिघडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याची विरोधकांनी भाजपवर केली. तर अशा घटना त्र्यंबकेश्वर सह संपूर्ण महाराष्ट्रात घडत आहे असं भाजप नेते आमदार नितेश राणे म्हटलं होतं.

नाशिक : मागिल काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर मंदिर हे वादाचं केंद्र बनलेलं आहे. येथे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेश द्वारावर पहिल्या पायरीवर धूप दाखविण्याच्या प्रकाराला घडला. त्यावरून आता धार्मिक रंग देत राजकारण सुरू झालं आहे. तर त्र्यंबकेश्वर परिसरात सामाजिक सलोखा, शांतता बिघडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याची विरोधकांनी भाजपवर केली. तर अशा घटना त्र्यंबकेश्वर सह संपूर्ण महाराष्ट्रात घडत आहे असं भाजप नेते आमदार नितेश राणे म्हटलं होतं. तर ते आज त्र्यंबकेश्वर राजांची महाआरती करणार आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिर बचाव समितीच्या वतीने देखील सकाळी 10 वाजता महाआरती करण्यात येणार आहे. या आरतीसाठी हिंदुत्ववादी संघटनेतर्फे हिंदू बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी माजी आदिवासी मंत्री अशोक उईके हे देखील उपस्थित राहणाह आहेत. त्यामुळे तेथे आता मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मंदिर परिसराला पोलीस छावनीचे स्वरूप आले आहे. तर काही दिवसांपूर्वी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मंदिराच्या पायरीवर गोमूत्र टाकत शुद्धीकरणदेखील करण्यात आले होते.

Published on: May 23, 2023 12:38 PM