त्र्यंबकेश्वर मंदिर वादावरून राज ठाकरे भाजपमध्ये जुंपली; ”त्या” वक्तव्यावरून तुषार भोसले यांचा पलटवार
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अनेकांना झापलं. तसेच तो प्रश्न गावकरी आणि तेथील संस्थानाचा आहे. तो त्यांनीच सोडवायचा. त्यात यात बाहेरच्या लोकांनी तिथे जाऊन आंदोलन करण्याची गरज नाही असं म्हटलं होतं.
मुंबई : त्र्यंबकेश्वर मंदिरातील धूप दाखवण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर उरुस आयोजकांनी पुढच्या वर्षीपासून त्र्यंबकेश्वराला धूप न दाखवण्याचा निर्णय घेतला. तो काही शमण्याचे नाव घेताना दिसत नाही. यावरून राजकीय पक्षांसह साधू आणि मंहत यांनी देखील आपल्या भूमिका मांडल्या आहेत. याचमुद्द्यावरू मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अनेकांना झापलं. तसेच तो प्रश्न गावकरी आणि तेथील संस्थानाचा आहे. तो त्यांनीच सोडवायचा. त्यात यात बाहेरच्या लोकांनी तिथे जाऊन आंदोलन करण्याची गरज नाही असं म्हटलं होतं. त्यावरून आता पुन्हा एकदा राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, आता भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी राज ठाकरे यांच्या त्या वक्तव्यावरून पलटवार करत जळजळीत टीका केली आहे. त्यांनी मंदिराचा प्रश्न फक्त एका गावाचा नाही. तो हिंदू धर्माचा आहे. तर हिंदू धर्म हा कमकूवत नाही. त्यामुळे त्या बाबतीतले सगळे नियम परंपरा हे ठरवण्याचे अधिकार धर्मशास्त्राचे जाणकार आणि मंदिर समितीला आहेत. ते आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडतील बाकीच्यांनी त्यात नाक फुटसायला जाऊ नये आणि हिंदू धर्म आणि धर्मातले लोक मजबूत आहेत. बाकीच्यांनी आपले कमकूवत पक्षाकडे लक्ष द्यावं असा टोला लगावला आहे.