केंद्राकडून वाहन कायद्यात बदल अन् ट्रक ड्रायव्हर थेट उतरले रस्त्यावर, काय आहे नवा हिट अँड रन कायदा?

| Updated on: Jan 02, 2024 | 3:32 PM

केंद्राने केलेल्या या कायद्यातील बदल पुन्हा दुरूस्ती करा, याकरता देशभरातील ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. केंद्र सरकारने कायद्यात असा कोणता बदल केला की ज्यामुळे ट्रक चालकांनी थेट संपाचं हत्यार उपसलंय. केंद्र सरकारने ‘हिट एंड रन’ प्रकरणात कठोर नियम केले आहेत.

मुंबई, २ जानेवारी २०२४ : केंद्र सरकारच्या वाहन कायद्यामध्ये बदल केला आणि संपूर्ण देशातील ट्रक ड्रायव्हर थेट आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, केंद्राने केलेल्या या कायद्यातील बदल पुन्हा दुरूस्ती करा, याकरता देशभरातील ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. केंद्र सरकारने कायद्यात असा कोणता बदल केला की ज्यामुळे ट्रक चालकांनी थेट संपाचं हत्यार उपसलंय. केंद्र सरकारने ‘हिट एंड रन’ प्रकरणात कठोर नियम केले आहेत. यापूर्वी एखादा ट्रकचालक धडक देऊन पळून गेल्यास त्याला ३ वर्षांची कैद असा कायदा होता. तर नव्या कायद्यानुसार, चालकाला १० वर्ष कैद आणि ७ लाखांचा दंड केला केलाय. ट्रक चालकाने धडक दिल्यास संबंधिताला दवाखन्यात नेणं गरजेचं आहे. पण तो पळून जात असेल तर दंडात्मक कारवाई योग्य ठरते, असे सरकारने म्हटले आहे. तर यावर ट्रक चालकांचं असं म्हणणं आहे की, अनेकदा चूक नसतानाही पळून जावं लागतं कारण अपघातानंतर जमलेल्या जमावाकडून मारहाणीची भीती असते, बघा अजून काय झालेत बदल?

Published on: Jan 02, 2024 03:32 PM
स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी ‘मविआ’तून लोकसभा लढवणार? उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर दाखल
स्वाभिमानीचे राजू शेट्टी ‘मविआ’त जाणार की नाही? थेट सांगितलं भेटीत नेमकं काय झालं?