भिडे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी भडकले, म्हणाले, ‘हा माणूस एवढा निर्लज्ज’
संभाजी भिडे यांनी अमरावतीत एका व्याख्यानात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यावरून अख्ख्या महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आंबेडकरवादी संघटनांचे नेते रस्त्यावर उतरले. त्यांच्याकडून भिडे यांचा निषेध केला.
ठाणे, 30 जुलै 2023 | शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी अमरावतीत एका व्याख्यानात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यावरून अख्ख्या महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आंबेडकरवादी संघटनांचे नेते रस्त्यावर उतरले. त्यांच्याकडून भिडे यांचा निषेध केला. तर भिडे यांच्यावर टीका करताना काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अटकेची मागणी केली. हा वाद थांबतो ना थांबतो तोच भिडे यांनी काल यवतमाळमध्ये स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर देखील टीका केली. त्यावरून आता नवा वाद होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या निंदाजनक वक्तव्यावर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तुषार गांधी यांनी, माझ्यासाठी हे वैयक्तिक दु:ख नाही. पण, हा माणूस एवढे निर्लज्जपणे असा बोलतो, लोक त्यावर टाळ्या मारतात, हसतात. राज्यात असं सुरू असताना पुरोगामी महाराष्ट्र नुसता बघत बसतो, हेच चिंता जनक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.