अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे यांच्यात शाब्दिक चकमक; भर बैठकीत नेमकं काय घडलं? पाहा स्पेशल रिपोर्ट...

अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे यांच्यात शाब्दिक चकमक; भर बैठकीत नेमकं काय घडलं? पाहा स्पेशल रिपोर्ट…

| Updated on: Aug 08, 2023 | 7:24 AM

औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले. निधी वाटपावरून या बैठकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली.

औरंगाबाद, 8 ऑगस्ट 2023 | औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले. निधी वाटपावरून या बैठकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे डीपीडीसीची बैठक वादळी ठरली.कन्नडचे ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी या बैठकीत निधीचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या मतदारसंघात एक पैसाही मिळाला नसल्याचं राजपूत म्हणाले. त्यावर जिल्हाधिकारी त्याबाबत तुम्हाला पत्र देऊन खुलासा करतील, असं पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितलं. पण भुमरे यांचं उत्तर उडवाउडवीचं वाटल्याने अंबादास दानवे यांनी या उत्तराला आक्षेप घेतला आणि दानवे संदीपान भुमरे यांच्यावर धावून गेले. नेमकं या बैठकीत काय घडलं यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…

 

Published on: Aug 08, 2023 07:24 AM