Nashik Crime : दोन सख्या भावांच्या खुनाने नाशिक हादरलं
नाशिकमध्ये काल दोन सख्या भावांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यातील एक भाऊ हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा शहर उपाध्यक्ष असल्याची माहिती मिळाली आहे.
नाशिकमध्ये 2 भावांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल नाशिकमध्ये रंगपंचमीची धूम सुरू असताना शस्त्राने वार करून दोन्ही भावांची एकाच वेळी हत्या केल्याची ही घटना नाशिकच्या आंबेडकरवाडीमध्ये घडली आहे. मुन्ना जाधव आणि प्रशांत जाधव अशी हत्या झालेल्या दोन्ही भावांची नावं आहे. विशेष म्हणजे मुन्ना जाधव हा राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचा शहर उपाध्यक्ष असल्याची देखील माहिती समोर आली आहे. हत्येचं कारण अद्याप समजलेल नसून हल्लेखोर फरार आहेत. नाशिकच्या उपनगर परिसरात या संदर्भात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आलेला आहे.
Published on: Mar 20, 2025 12:01 PM
Latest Videos

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या

नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया

तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
