Vijay Vadettiwar on Farmer | दोघांच्या सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, सरकारच्या असंवेदनशीलतेवर वडेट्टीवारांची टीका
Vijay Vadettiwar on Farmer | विदर्भासह मराठावाडा आणि महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या असंवेदनशील सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Vijay Vadettiwar on Farmer | विदर्भासह मराठावाडा आणि महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे (heavy rainfall) शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान (Huge loss)झाले आहे, अशा परिस्थितीत, राज्यात नव्याने स्थापन झालेल्या दोन लोकांच्या सरकारने (Newly Formed Two People Government) तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)यांनी केली आहे. सरकाराच्या असंवेदनशीलतेवर त्यांनी टीका केली. या महिन्यात 17,18 आणि 19 तारखेला प्रचंड पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा पावसाने झोडपले. त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक जिल्हे पुरबाधीत झाले. अजून पंचनामे झाले नाहीत, पण आतापर्यंतची जी आकडेवारी हाती आली आहे. त्यानुसार, 50 हजार हेक्टर जमीनीवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. खरीपाचं पिक शेतकऱ्यांच्या हातून गेलं आहे. दुसरं पीक त्या ठिकाणी येऊ शकत नाही. एक हंगाम शेतकऱ्यांचा पूर्ण बुडाला आहे आणि रब्बी पिकासाठी तर त्याच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा ऐकून आम्ही ही थकल्याचा टोलाही त्यांनी हाणला.