Nagpur accident : स्कूल व्हॅन नाल्यात कोसळून अपघात, दोन विद्यार्थी जखमी
नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या बेसा परिसरात स्कूल व्हॅन नाल्यात पडून मोठा अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातामध्ये दोन मुलं किरकोळ जखमी झाली आहेत.
नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या बेसा परिसरात स्कूल व्हॅन नाल्यात पडून मोठा अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातामध्ये दोन मुलं किरकोळ जखमी झाली आहेत. हा अपघात कशामुळे झाला याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र स्कूल व्हॅनचं स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात स्कूल व्हॅनचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
Latest Videos