2000 Rupees Note : नोट बंदीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल; आंदोलन करत केला आरोप, म्हणाले भाजपने याच नोटा...

2000 Rupees Note : नोट बंदीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल; आंदोलन करत केला आरोप, म्हणाले भाजपने याच नोटा…

| Updated on: May 20, 2023 | 2:25 PM

30 सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्या आहेत. याचदरम्यान आता पुण्यात या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करत मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

पुणे : दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. तर 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्या आहेत. याचदरम्यान आता पुण्यात या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करत मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने केली. हे आंदोलन पुण्यातील रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाबाहेर करण्यात आलं. शहराध्यक्ष प्रशांत जगतापांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. तर आंदोलना वेळी भाजपवर आरोप देखील करण्यात आला. ज्या दोन हजारांच्या नोटा बंद करण्यात आल्या त्याच भाजपनं कर्नाटक निवडणुकीत वापर केला असं म्हटलं आहे. तर मोदी सरकारने चूकीचा निर्णय घेतला असून त्यांचाच काही उपयोग नाही. तर ज्याप्रमाणे या नोटा मागे घेतल्या त्याप्रमाणे जनतोच आता 2024 मध्ये हे सरकार मागे घेईल असंही म्हटलं आहे.

Published on: May 20, 2023 02:25 PM