धक्कादायक; मद्य पिऊन जोरदार भांडण; धबधब्याच्या कड्यावरून दरीत कोसळून दोन युवकांचा मृत्यू
त्याचबरोबर अनेक जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधबे देखील प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक हे सध्या वर्षा सहलीतून आनंद लुटण्यासाठी धबधब्यांकडे जात आहेत.
वाई, 17 जुलै 2023 |: सध्या जोरदार पावऊस राज्याच्या अनेक भागत पडताना दिसत आहे. अनेक ठिकाणीयामुळे धरणं भरत आहेत. तर काही छोटे-मोठी धरणंही ओव्हर फ्लो होत आहेत. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधबे देखील प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक हे सध्या वर्षा सहलीतून आनंद लुटण्यासाठी धबधब्यांकडे जात आहेत. मात्र येथे मद्य आणि भांडणाचे प्रमाण वाढताना समोर येत आहे. याच मद्य आणि भांडणामुळे दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. साताऱ्यातील कास परिसरातील एकिव धबधब्याच्या कड्यावरून दरीत कोसळून दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. तर धबधब्या जवळून दोघेजण कड्यावरून पाय घसरून दरीत कोसळल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले असून त्यांच्यात मद्य पिऊन भांडण सुरू होते अशीही माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. तर बसप्पाचीवाडी आणि करंजे येथील हे युवक असल्याची माहिती समोर येत आहे. तर सध्या मेढा पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले आहेत. शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीने दरीतून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते.