उबाळे नगरमध्ये दुकानांना भीषण आग, पुणे व PMRDA अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

उबाळे नगरमध्ये दुकानांना भीषण आग, पुणे व PMRDA अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

| Updated on: Apr 20, 2022 | 1:04 PM

पुण्यातील (Pune)खराडी, उबाळे नगर, महालक्ष्मी लॉन्स समोर दुकानांना आग लागली असून घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची एकूण 6 वाहने दाखल झाली आहेत.

मुंबई :  पुण्यातील (Pune)खराडी, उबाळे नगर, महालक्ष्मी लॉन्स समोर दुकानांना आग लागली असून घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची एकूण 6 वाहने दाखल झाली आहेत. आग विझवण्याचे काम जवान करीत आहेत.दुकानांना लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आटोक्यात आणली.त्यामुळं मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.मात्र, एकूण बारा दुकाने आगीच्या (Fire) भक्ष्यस्थानी पडल्याने मोठी वित्तहानी झालीये.फर्निचरसह रेडियम, ऑटोमोबाईल, मोबाईलच्या एकूण बारा दुकानांना आगीची पूर्ण झळ बसली.शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय.

Published on: Apr 20, 2022 01:04 PM