‘वेळीच सावध व्हा’ या आंबेडकर यांच्या सल्ल्यावर शिवसेना नेत्या म्हणाला, ‘ते मविआत किती?’
आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या नादी लागू नये. काँग्रेस केंद्रीय नेतृत्वात अडकलं आहे. तर राष्ट्रवादी कुटुंबवादात अडकलेलं आहे, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यावरही उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रत्नागिरी : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीपासून सावध राण्याचा सल्ला दिला. त्यावरून आता जोरदार राजकारण पहायला मिळत आहे. आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या नादी लागू नये. काँग्रेस केंद्रीय नेतृत्वात अडकलं आहे. तर राष्ट्रवादी कुटुंबवादात अडकलेलं आहे, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यावरही उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी, काही वर्षांपुर्वी राष्ट्रवादीत होतो, पण 2014 ला मी राष्ट्रवादी सोडली. आता मी शिवसेनेत आहे. पण एवढं निश्चितपणे सांगतो की, महाविकास आघाडी पुढे सत्तेत येणार नाही, असं सामंत म्हणालेत. तर प्रकाश आंबेडकर हे तळागाळात काम करणारे नेते आहेत. ते जर बोलत असतील तर त्यावर उद्धव ठाकरेंनी विचार करणं गरजेचं आहे. ठाकरे गट आणि वंचित यांनाच एकत्र यावं लागेल. महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर किती कंफर्टेबल असतील मला माहिती नाही, असं सामंत म्हणालेत.